शिल्पा शेट्टी सांगते, असा बनवा सोजीचा आरोग्यवर्धक केक

Shilpa Sheety

ख्रिसमसला केक करण्याचे राहून गेले ? निराश होऊ नका. लगेच नवे वर्ष सुरू होणार आहे. नवे वर्ष साजरे करण्यासाठी सोजीचा आरोग्यवर्धक केक बनवा. हा केक कसा बनवायचा हे सांगते आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. या केकसाठी साखर, कणकेची गरज नाही. सोजी आणि सुके मेवे टाकून टाकून केक कसा बनवायचा याचा व्हीडीओ दाखवते आहे शिल्पा शेट्टी.

आवश्यक सामग्री

३/४ कप सोजी

एक चमचा सुंठ

बारीक तुकडे केलेले व भिजवलेले १ कप बदाम आणि अक्रोड फळांच्या रसात मिसळा.

कृती

बाऊलमध्ये सोजी आणि सुंठ चांगले मिसळा.

बारीक तुकडे केलेले व भिजवलेले आणि फळांच्या रसात मिळालेले बदाम आणि अक्रोड यात टाका. चांगले मिसळा.

बेकिंग ट्रेला तेल लावा आणि त्यावर कणिक (गव्हाचे पीठ) पसरवा. त्यात केकचे तयार केलेले मिश्रण टाका. त्यावर बदाम आणि अक्रोडचे तुकडेही टाकू शकता.

हे मिश्रण ओव्हनमध्ये १८० डिग्री सेंसियसवर ४५ मिनिटे भाजू द्या. केक तयार झाला.

केक थंड झाल्यानंतर त्याच्या चकत्या कापा. चकतींवर जाम सॉस टाकून त्याचा आस्वाद घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER