‘हंगामा २’ च्या शूटिंगसाठी शिल्पा शेट्टी आणि टीम खासगी विमानाने मनालीला रवाना

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) हे चित्र विमानतळावरून शेअर केले आहे. ती हंगामा २ च्या शूटसाठी मुंबईहुन निघाली आहे.

‘हंगामा २’चे (Hangama 2) कलाकार या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी रविवारी मनालीला रवाना झाले. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हंगामा २ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. शिल्पाने चित्रपटाची शूटिंग पुन्हा सुरू होण्याविषयी इंस्टाग्रामवरही एक अपडेट दिले आहे.

शिल्पाने एक फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह एका खासगी विमानाच्या बाहेर पोज करताना दिसत आहे. परेश रावल, मीजान आणि प्रणीता सुभाष हे कलाकार फोटोमध्ये दिसत आहे.

शिल्पाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘और हम चल पड़े हैं … आता काही हंगामा निर्माण करण्याची वेळ आली आहे. हॅशटॅहंगामा २ हॅशटॅगकॉन्फ्यूजनअनलिमिट हॅशटॅगशूटमोड हॅशटॅग्सेफ्टीफर्स्ट हॅशटॅगपावरॉन हॅशटॅगबॅकटूवर्क हॅशटॅगवर्कडायरीज हॅशटॅगटेकऑफ. ‘

२००३ साली रिलीज झालेल्या प्रियदर्शन यांच्या हंगामा या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER