अयोध्या राममंदिरासाठी लंकेच्या अशोक वाटिकेतून शिळा दान

Shila donation from Ashoka Vatika in Lanka for Ayodhya Ram Temple

श्रीलंका :- अयोध्येत राममंदिरासाठी श्रीलंकेतील अशोक वाटिकेतून राम मंदिरासाठी शिळा दान मिळाली (Shila donation from Ashoka Vatika in Lanka) आहे. ही शिळा श्रीलंकेचे भारतातील राजदूत मिलिंदा मारागोदर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

सीतेला रावणाने लंकेत नेल्यानंतर अशोक वाटिकेत ठेवले होते, अशी आख्यायिका आहे. नंतर तिला सीता वाटिकाही म्हणतात. हा परिसर आज सीता एलिया नावाने ओळखला जातो. येथे सीतेचे एक मंदिर आहे. ‘सीता अम्मान कोविले’ नावाने ते प्रसिध्द आहे. इथे अशोकाची असंख्य झाडे आहेत. या वाटिकेमधून एक नदी वाहते तिचे नाव सीता आहे. या नदीचे वैशिष्ट म्हणजे तिच्या दोन्ही काठावरील मातीचा रंग वेगवेगळा आहे. वाटिकेच्या बाजूची माती पिवळी तर दुसऱ्या तीरावरची काळी आहे.

असे सांगितात की हनुमानाने लंकेला आग लावली तेव्हा नदीच्या दुसऱ्या काठावरची माती जळून काळी पडली. अशोक वाटिकेत सीतामाई होती त्यामुळे त्या भागाला हनुमानाने आग लावली नाही. त्यामुळे नदीच्या या काठावरची माती पिवळी राहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER