शिखर धवनने रोहित शर्मा आणि सुरेश रैनाला मागे सोडल, संपादन केले “हे” विशेष स्थान

Shikhar Dhawan

IPL मध्ये सलग दोन शतके ठोकणार्‍या शिखर धवनने (Shikhar Dhawan) ५००० धावा पूर्ण केल्या, IPL मध्ये ५००० धावा करणार ५ वा फलंदाज ठरला धवन.

दिल्ली कॅपिटलचा (Delhi Capitals) सलामीवीर शिखर धवनने IPL मध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर KXIP बरोबरच्या सामन्यात धवनने हे स्थान मिळवले. IPL मध्ये ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पाचवा फलंदाज आहे.

या सामन्याआधी धवनला आयपीएलमध्ये ५ हजारी होण्यासाठी ६२ धावांची आवश्यकता होती, जे गब्बरने उत्तम प्रकारे मिळवले.

धवनशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ५७५९, चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैनाने (Suresh Raina) ५३६८, मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ५१५८ आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५०३७ धावा केल्या आहेत.

शिखर धवन सर्वात कमी डावात ५००० धावा करत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि यासाठी धवनने सुरेश रैना आणि रोहित शर्माला मागे सोडले आहे. धवनने १६८ डावात ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर रैनाने हे कामगिरी १७३ आणि रोहितने १८७ डावात केली. डेव्हिड वॉर्नर या शर्यतीत आघाडीवर आहे. वॉर्नरने हे कामगिरी १३५ डावात पूर्ण केली. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने १५७ डावात हा पराक्रम केला होता.

धवनने KXIP विरुद्ध ६१ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १०६ धावांची भक्कम खेळी केली. IPL मध्ये दोन सामन्यात सलग दोन शतके ठोकणारा धवन एकमेव खेळाडू ठरला आहे. तत्पूर्वी धवनने दिल्लीच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध नाबाद १०१ धावांचा स्फोटक डाव खेळला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER