शिखर बँक घोटाळा : पोलिसांच्या ‘क्लोजर रिपोर्ट’ला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

Bombay HC & Mumbai Police

मुंबई :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी मुंबई (Mumbai) पोलिसांनी दाखल केलेल्या ‘क्लोजर रिपोर्ट’ला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली आहे. मूळ तक्रारदार सुरिंदर मोहन अरोरा यांनी यांच्यासोबत इतरही काही लोकांनी याविरोधात याचिका दाखल केल्या आहेत.

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता आणि अजित पवारांसह इतर ६९ जणांविरोधात कोणताही पुरावा नाही असे सांगत संबंधितांना क्लीन चिट देण्यात आली होती.

प्रकरण फार जुने आहे.  त्यामुळे आता यासंदर्भात कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत असा दावा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याला आव्हान देण्यात आले असून लवकरच त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखर कारखाने, सूत गिरण्या आणि इतर अनेक संस्थांना भरमसाट नियमबाह्य कर्जे दिली आणि संबंधित संस्थांनी या कर्जाची परतफेड केली नाही.  त्यामुळे ठेवीदारांचे २५ हजार कोटी रुपये बुडाले, असा आरोप मूळ याचिकेत करण्यात आला होता. अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांची नावे होती. यावर रिझर्व्ह बँकेने २०११ मध्ये तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. संचालक मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्याने बँकेला मोठा आर्थिक फटका बसला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

या प्रकरणी २०१५ साली याचिका दाखल करण्यात आली होती. गेल्या वर्षी (ऑगस्ट २०१९)  उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून संबंधितांवर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ६७ हजार ६०० पानांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. यात तपास करणाऱ्या विशेष पथकाने, संबंधित प्रकरण जुने आहे.  त्यामुळे आरोपींविराधात कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असे सांगितले.

ही बातमी पण वाचा : राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चिटविरोधात माजी मंत्र्यांसह पाच जणांची याचिका  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER