
सांगली : विधान परिषदेच्या आमिषासाठी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी (Raju Shetti) आडत-दलालासाठी तुणतुणे घेऊन उभे आहेत. ते केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात त्यांची वकिली करत आहेत. शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, अशी टीका माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी केली. शेलार येडेमच्छिंद्र येथे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राहुल महाडिक उपस्थित होते.
आ. शेलार म्हणाले, सत्तरच्या दशकात आलेल्या पिंजरा या मराठी चित्रपटात एका मोहापायी एका आदर्श शिक्षकाला तमाशाच्या फडात तुणतुणे घेऊन उभे राहावे लागते. तशी अवस्था शेट्टी यांची झाली आहे. विधानपरिषदेच्या आमिषापोटी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे शेट्टी आडतदार, दलालांसाठी महाविकास आघाडीच्या बाजूने तुणतुणे घेऊन उभे आहेत. ते त्यांची वकिली करत आहेत.
ते म्हणाले, फुले, आंबेडकर, शाहू यांची नावे घेऊन राजकारण करणारे महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या विचाराच्या विरोधात कृती करत आहेत. केंद्राचा कृषी कायदा हा शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी मजबूत करणारा आहे. अडत, दलाल यांना समर्थन करणारेच या कायद्याला विरोध करत आहेत.
ही बातमी पण वाचा :क्रिकेट असेशिएशनच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं : शिट्टी यांचा आशिष शेलाराना टोला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला