राजू शेट्टीजी को ‘घुस्सा क्यो आया’

Raju Shetty

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी जिल्हापरिषदेचे सीईओ अमन मित्तल (Aman Mittal) यांना फोनवरुन दिलेल्या तंबीची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरु आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत मित्तल यांनी फोनला प्रतिसाद न दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेट्टी यांनी मित्तल यांना वरील एसएमएस पाठविला. त्यात शेट्टी यांनी इतकेही बेफिकीर वागू नका, अन्यथा तुमचे सगळं बाहेर काढावं लागेल, असा इशाराच मित्तल यांना दिला. राजू शेट्टीजी को घुस्सा क्यो आया… अशी मिश्किल शब्दात कोल्हापुरात शेट्टी आणि मित्तर यांच्या संभाषणावर प्रतिक्रिया उमठत आहेत.

रेमिडेसीवर इंजेक्शन जिल्हा परिषदेने मोफत देण्याचे आयोजन केले होते. त्यासाठी तीन डाॅक्टरांचे पथक नेमले होते. मात्र, गरीब गरजू लोकांना रेमिडेसिवर मिळावे यासाठी ही योजना होती. मात्र रेमडेसीवर इंजेक्शनचा काळाबाजार होवू लागला. श्रीमंत वर्गातील लोकही मोफत इंजेक्शन नेत असल्याचे पुढे आल्याने ही योजना बंद केली. फक्त शासकीय रुग्णालयातील रुग्णावर उपचारासाठी मोफत इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले.

दरम्यान, शिरोळ तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण काही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना रेमडेसिवीरची गरज होती. म्हणून संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी शेट्टी यांची भेट घेतली. कोठेही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याचे या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे शेट्टी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल या यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क सा साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, मित्तल ड यांनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला हो नाही. त्यामुळे शेट्टी संतप्त झाले. त्यांनी ची मित्तल यांना एसएमएस पाठविला. सूच त्यामध्ये म्हटले आहे की, अजूनपर्यंत कोरोनाच्या रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन पोहोचले नाही. काय पेशंट मरायची वाढ बघत आहात काय? आपण इतकेही बेजबाबदार वागू नका. मी तुम्हाला कोणत्या ठेकेदारांमार्फत एजन्सी घ्या, अथवा द्या म्हणून सांगत नाही. जनतेच्या भल्यासाठी तुम्हाला फोन करतो. इतकेही बेफिकीर वागू नका. अन्यथा मला सगळंच बाहेर काढावं लागेल असा इशाराच शेट्टी यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER