बॉलिवूडने अॅडल्ट कंटेट क्रिएटर बनवल्याचा शर्लिन चोप्राचा आरोप

Sherlyn Chopra

दोन दिवसांपूर्वी शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. जिया खानच्या बहिणीने साजिद खानचे (Sajid Khan) वास्तव उघड केल्यानंतर शर्लिननेही साजिदबाबतचा अनुभव शेअर करीत, काम देण्याच्या नावाखाली मुलींचे शोषण करू नका असे तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते. आता शर्लिनने संपूर्ण बॉलिवुडवरच निशाणा साधत, बॉलिवूडमुळेच मी अॅडल्ट कंटेट क्रिएटर बनल्याचे म्हटले आहे. शर्लिनने सोशल मीडियावर एका श्रृंगारिक चॅनेल सुरु केले असून त्यावर ती स्वतःचे अत्यंत हॉट असे व्हडियो अपलोड करीत असते. तिचे हे व्हीडियो मोठ्या प्रमाणावर पाहिले जात आहेत. यातून तिला कमाईही चांगली होत आहे. साजिदचा अनुभव सांगितल्यानंतर तिच्या या अॅडल्ट कंटेटबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली होती. त्यावर शर्लिनने आपले मन मोकळे केले आहे.

शर्लिनने यावेळी संपूर्ण बॉलिवूडवरच निशाणा साधला आहे. ‘मी हिरोईन बनायला आली होती. पण बनली अॅडल्ट कंटेंट क्रिएटर.. याचे संपूर्ण श्रेय मी बॉलिवूडला देते.’ असे म्हणत तिने एक ट्विट केले असून एक व्हीडियोही अपलोड केला आहे. या व्हीडियोमध्ये तिने याबाबत सविस्तर वक्तव्य केले आहे. शर्लिन म्हणते, ‘2005 मध्ये साजिद माझ्यासोबत असा वागला होता मग इतक्या वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये तू तो मुद्दा का उपस्थित केला असा प्रश्न मला अनेक जण विचारत आहेत. याबाबत मी स्पष्टीकरण देण्यासाठी हा व्हीडियो अपलोड करीत आहे. 2005 मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले होते आणि तेव्हा मी बॉलिवूडमध्ये न्यू कमर होती. त्यामुळे तेव्हा मी या विषयावर बोलू शकत नव्हते. कारण मला काम करायचे होते. पण जेव्हा मी टू मोहिम सुरु झाली तेव्हा मला जाणवले की, बॉलिवूडमध्ये शोषण झालेली मी एकटी नसून अनेक मुली आहेत. त्यामुळे मी माझी गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला.

शर्लिन पुढे म्हणते, आता मी हा मुद्दा उचलला कारण बॉलिवूडमध्ये काय चालते ते लोकांना समजावे आणि यापुढे बॉलिवूडमध्ये कोणत्याही मुलीला लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागू नये. अॅडल्ट कंटेट क्रिएटर तर मी आत्ता बनले आहे. 2005 मध्ये मी मोठी नायिका बनण्याचे स्वप्न पाहाणारी महत्वाकांक्षी मुलगी होते. स्त्री कोणीही असो तिच्यासोबत अश्लील चाळे कोणीही करू नये असेही शर्लिनने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER