शेलार शोधत आहेत भाजपाच्या पराभवाची कारणे

Ashish Shelar

नागपूर :- विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपाचा पराभव का झाला? याची करणं शोधण्यासाठी भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) कामाला लागले आहेत. भाजपच्या केंद्रीय कमिटीने त्यांना याबाबत आदेश दिले आहेत.

आशिष शेलार तीन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. २६ डिसेंबरला संध्याकाळी नागपुरात दाखल झाले. आज (२७ डिसेंबर) सकाळपासून भाजपच्या जवळपास ८० वर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नागपूरमधील कामे आटोपल्यानंतर ते उद्या अमरावतीत जाणार आहेत (Ashish Shelar on Vidarbha tour).

नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा विदर्भातील नागपूर आणि अमरावती दोन्ही जागांवर पराभव झाला. या निवडणुकीत पुणे आणि मराठवाड्यातही पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींकडून आमदार रवींद्र चव्हाण यांना पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाचे कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात जाऊन चिंतन करण्यास आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगण्यात आले आहे (Ashish Shelar on Vidarbha tour).

आशिष शेलार, रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन पराभवाची कारणं शोधतील व औरंगाबाद, विदर्भ, पुण्याच्या पराभावाचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवतील.

ही बातमी पण वाचा : स्वतंत्र लढणे हे महाविकास आघाडी हे केवळ नाटक : चंद्रकांत पाटील

नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी प्रामुख्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर होती. पुण्यातील दोन्ही जागा जिंकण्याचं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्वीकारले होते. तर दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याची जागा खेचून आणण्याचा विडा उचलला होता, मात्र पाचही जागांवर पक्षाचा पराभव झाला.

विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर निकाल

  • पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी)
  • पुणे शिक्षक – जयंत आसगावकर (काँग्रेस)
  • नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस)
  • औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी)
  • अमरावती शिक्षक – किरण सरनाईक (अपक्ष)
  • धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य – अमरिश पटेल (भाजपा)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER