मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय? राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने शेलार संतप्त

Ashish Shelar

मुंबई : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांच्या मालवणी मतदारसंघात रामजन्मभूमीचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपा नेते आशिष शेलार प्रचंड संतापले व त्यांनी विचारले, मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय? (Ashish Shelar slams congress over ram janmabhoomi poster)

आशिष शेलार यांनी ट्विट केले – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मालवणी मतदारसंघात काही दिवसांपूर्वी हिंदू, दलित कुटुंबांवर घर सोडण्याचा दबाव आणला गेला होता. आता रामजन्मभूमीचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय?

जनतेच्या सहभागातून आणि समर्पणातून प्रभू रामाचे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहणार आहे. त्यासाठी मुंबईतील मालवणीतूनही निधी संकलित होणार आहे. पाहू कोण रोखते, असा इशाराही शेलार यांनी दिला. दरम्यान, मालवणीत राम जन्मभूमीचे काही पोस्टर फाडण्यात आले, त्यावरून राजकारण पेटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER