शेखर कपूर आणि शबाना आझमी यांनी केला होता साखरपुडा

Shekhar Kapoor and Shabana Azmi

बॉलिवुडमध्ये एकत्र काम करीत असल्याने अनेकांची प्रेम प्रकरणे सुरु होतात. मात्र यातील काही प्रेमप्रकरणेच लग्नापर्यंत पोहोचतात. विशेष म्हणजे ज्यांची प्रेम प्रकरणे अयशस्वी झाली त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पुढेही कायम राहिले. त्यांनी आपल्या या वैयक्तिक गोष्टीचा व्यावसायिक गोष्टीवर परिणाम होऊ दिला नाही. या यादीत प्रख्यात दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapoor) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. शेखर कपूर आणि शबाना आझमीच्या प्रेम प्रकरणाची माहिती फारच कमी जणांना ठाऊक आहे.

शेखर कपूर आणि शबाना आझमी एक-दोन नव्हे तर जवळ-जवळ सात वर्ष एकमेकांशी डेटिंग करीत होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांची सगाईही झाली होती आणि लवकरच लग्नही करणार होते. परंतु अचानक असे काही तरी घडले की दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. शबाना आझमीने नंतर अगोदरच लग्न झालेल्या प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले. जावेद अख्तर शबानाच्या घरी तिच्या वडिलांकडून कैफी आझमी यांच्याकडून कवितांचे धडे गिरवण्यास जात असत. तेव्हाच दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

खरे तर तेव्हा जावेद अख्तर यांचे लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलेही होती. शबानासाठी जावेद अख्तर यांनी आपल्या पहिल्या पत्नीला हनी इरानीला तलाक दिला आणि शबानाबरोबर लग्न केले. दुसरीकडे शेखर कपूर यांनीही माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या भाचीची मेधाशी लग्न केले. परंतु मेधाचा परदेशात मृत्यू झाल्यानंतर शेखर कपूर यांनी अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीशी लग्न केले. परंतु हे लग्नही फार काळ टिकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER