शीतल या सुविद्य, हुशार, कष्टाळू, कृतिशील समाज सुधारक होत्या – नीलम गोऱ्हे

Neelam Gorhe

मुंबई : डॉ. शीतल आमटे – करजगी या अत्यंत सुविद्य, हुशार, कष्टाळू, कृतिशील समाज सुधारक आणि वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असणाऱ्या होत्या. अनेक आकांक्षा असलेल्या त्या भावनाप्रधान सामाजिक कार्यकर्त्या होत्या, या शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शीतल यांना षधांजली अर्पण केली. शीतल यांनी आज आनंदवन (वरोरा) येथे घरी आत्महत्या केली.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, त्यांचा माझा गेले काही महिने अधिक चांगल्या प्रकारे परिचय झाला होता. २५ नोव्हेंबरला माझे आणि त्यांचे बोलने झाले होते. तेच आमचे शेवटचे बोलणे ठरले.

कौटुंबिक प्रश्नांसोबत त्यांच्या मनात कोणते विषय येत होते. त्यांना कोणत्या अडचणी जाणवत होत्या, त्या बद्दलसुद्धा आम्ही बोललो होतो. त्यानंतर शीतलच्या अशा अचानक धक्कादायक प्रकारे निधन झाल्याचं कळले. मला फार मोठा धक्का बसला.

शीतल अत्यंत सुविद्य, हुशार, कष्टाळू, कृतिशील समाज सुधारक आणि वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असणाऱ्या होत्या. अनेक आकांक्षा असलेल्या त्या भावनाप्रधान सामाजिक कार्यकर्त्या होत्या. आमच्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सला त्या महिलांच्या उद्योजकतेच्या विषयामध्ये सामाजिक संस्थांनीने तयार केलेले उद्योग आणि त्याच्यामधली भूमिका या विषयावर सहभागी देखील झाल्या होत्या. अशी आठवण नीलम गोऱ्हे यांनी सांगितली.

शीतलच्या निधनाने एक अतिशय उमदे नेतृत्व आपण गमावलेले आहे. ज्या प्रकारे त्यांनी कुष्ठ रोग्याची सेवा केली, त्याचे व्हीडिओसुद्धा त्यांनी मला पाठवले होते. अत्यंत कष्ट घेऊन त्या काम करत होत्या. काही प्रकल्पांसाठी त्यांना सरकारच्याकडून सहकार्य पाहिजे होती, त्या बद्दलसुद्धा मी त्यांना सांगितले होते. तुम्ही मला पत्र द्या, त्या त्या विभागाच्या तर्फे पाठपुरावा करायला मदत करते अशी मी ग्वाही दिली होती. शीतल यांनी आभार ही कळवले होते. असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. (Even after the death of Sheetal Amte his deeds and thoughts should get justice said by Neelam Gorhe)

शीतल आमटे – करजगी यांच्या दुःखद निधनाबद्दल मी श्रद्धांजली व्यक्त करते. त्यांच्यावर प्रेम करणारा आणि ज्यांना त्या हव्या होत्या, ज्यांना त्यांचे महत्व होते. त्यांच्या आणि जे त्यांचे बाकीचे जे सुह्रद, परिवार होते यांच्या दुःखात मी सहभागी आहे. शीतल यांच्या विचारांना त्याच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा असे मला वाटते. या शब्दात नीलम गोऱ्हे यांनी श्रद्धांजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER