शीना बोरा हत्याकांड; गरज भासल्यास फेरचौकशी – अनिल देशमुख

मुंबई : शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी गरज भासल्यास, फेरचौकशीचे आदेश देण्यात येतील, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. ‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर माध्यमांशी बोलताना, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज फेरचौकशीचे हे सूतोवाच केले. भाजपा सरकारचे अनेक निर्णय सध्या महाविकास आघाडी सरकारकडून बदलण्यात येत आहेत, हे येथे उल्लेखनीय.

भारताची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर

शीना बोरा हत्याकांडातील आरोपींशी संबंधित महत्त्वाची माहिती तत्कालीन कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त देवेन भारती यांनी लपविल्याचा आरोप राकेश मारिया यांनी केला आहे, हे विशेष. या प्रकरणी माध्यमांशी बोलताना, गृहमंत्री अनिल देशमुख आज मंगळवारी म्हणाले, आम्ही राकेश मारिया यांच्याकडून पुस्तकातील तपशिलाबाबत माहिती घेऊ. त्यांच्याशी चर्चा करून काय घडले होते, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर गरज भासल्यास, फेरचौकशीचे आदेश याप्रकरणी देण्यात येतील.