… ती राहते भाड्याच्या झोपडीत : खोटे ते खोटेच, राहुल गांधींचा मोदींना टोमणा

Rahul Gandhi-PM Modi

नवी दिल्ली :- भाजपाने एका वृत्तपत्रात दिलेली जाहिरात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहे. या जाहिरातीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली – वारंवार वारंवार पुनरावृत्ती करूनही खोटे खोटेच असते.

दोन वर्तमानपत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या फोटोसह एक जाहिरात प्रकाशित झाली आहे. ती १४ आणि २५ फेब्रुवारी रोजी छापली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत एका महिलेचा फोटो आहे. जाहिरातीत ती महिला सांगते – पंतप्रधान आवास योजनेतून मला घर मिळाले. डोक्यावर छप्पर मिळाल्याने सुमारे २४ लाख कुटुंबे स्वयंपूर्ण झाली. एकत्र येऊन आणि एकत्रितपणे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करुया. सोबत घोषणाही आहे, ‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर बंगाल‘ (Self-reliant India, self-sufficient Bengal).

मीडिया रिपोर्टनुसार, ज्या महिलेचे चित्र या जाहिरातीमध्ये छापले आहे तिचे नाव लक्ष्मी देवी (Laxami Devi) असे आहे. लक्ष्मीदेवी हिचे स्वतःचे घर नाही. ५०० रुपये महिन्याच्या भाड्याच्या एका अगदी लहान खोलीत ती राहते. लक्ष्मी देवीला हे पण माहीत नव्हते की तिचे हे छायाचित्र कधी घेतले होते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER