शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘एकदा शशी कपूर माझ्यामागे बेल्ट घेऊन मारण्यासाठी धावले होते’

Shatrughan Sinha- Shashi Kapoor

तुम्हाला माहिती आहे काय की, जेव्हा शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha ) बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप अ‍ॅक्टिव होते, त्यावेळी ते सेटवर खूप उशिरा यायचे? शत्रुघ्न सिन्हा तीन-चार तास उशिरा यायचे आणि त्यांचे को-स्टार्स वाट पाहात राहायचे. एकदा जेव्हा शत्रुघ्न सिन्हा सेटवर उशिरा आले तेव्हा शशी कपूर (Shashi Kapoor) त्यांना मारण्यासाठी पट्टा घेऊन धावले होते. एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा बोलले, “एकदा शशी माझ्यामागे बेल्टने मारण्यासाठी धावले होते; कारण मी सेटवर खूप उशिरा पोहोचलो होतो.” मी त्यांना सांगितले की, चित्रपट निर्माते मला कास्ट करतात; कारण मी वक्तशीर (Time Punctual) आणि प्रतिभावान (Talented) आहे.

ते मला म्हणाले, असं बोलायला याला लाज नाही वाटत आहे. या सर्व गोष्टी चांगल्या विनोदाने घडत होत्या. शशी आणि माझी खूप चांगली कैमाराड्री (Camaraderie) होती. शत्रुघ्न पुढे सांगतात की, एकदा मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत शूटिंग करत होतो आणि सेटवर पोहचण्याची वेळ पहाटे साडेचार वाजता होती. मी त्याच वेळी तेथे पोहचलो. हा चित्रपट होता ‘अंतरजली जत्रा’, ज्याचे शूटिंग कोलकाता येथे सुरू होते. मी वेळेवर आलो होतो आणि शूटिंगही वेळेवर संपवलं. शत्रुघ्न सिन्हा सांगतात की, हो, मी लेट लतीफ होतो पण मी मुद्दाम उशिरा जात नव्हतो.

मी फक्त खात्री करत होतो की, सेटवर जाण्यापूर्वी मी योगा करू शकतो, ज्यास बराच वेळ लागत असे आणि यामुळे मला सेटवर पोहचण्यास उशीर व्हायचा. बर्‍याच वेळा मी १२ किंवा १२:३० वाजता सेटवर पोहचलो. ज्यामध्ये मला सकाळी ९ वाजता पोहचायचे होते. माझी मेमरी खूप शार्प होती आणि अजूनही आहे. मी एकदाच माझ्या लाईन्स वाचत होतो आणि एकाच टेकमध्ये शॉट देत होतो. अशा परिस्थितीत आम्ही वेळेपूर्वी शूटिंग पूर्ण करायचो. मी माझ्या काळातील एक वन-टेक आर्टिस्ट असायचो. कधी कधी जेव्हा दुसर्‍या टेकची गरज भासली जात असे तेव्हा मी शॉट दुसरा देत असे; परंतु मी माझ्या आवडीनुसार सीन्समध्ये बदल करायचो, जेणेकरून फिल्म मेकर्सना जो शॉट आवडेल तो घेईल.

कोणत्याही निर्मात्याने उशिरा येण्याबद्दल माझी तक्रार केली नाही. मनमोहन देसाई यांच्यासमवेत मी १०-११ आणि हर्मेश मल्होत्रा यांच्यासह १३ चित्रपट केले. मी चूक केली असती तर हे निर्माते मला पुन्हा कास्ट करतील का? तुम्हाला माहीत आहे काय की, मला ‘शोले’, ‘दिवार’, ‘अचानक’ आणि ‘सत्ते पे सत्ता’ची ऑफर आली होती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER