पहिल्याच सभेत मिथुनचा कोब्रा शत्रुघ्न सिन्हाला आवडला नाही

Mithun Chakraborty - Shatrughan Sinha

नागपूर : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी ७ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी विरोधकांना इशारा देतांना ते म्हणाले, मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल. मिथुनचा हा डायलॉग सोशल मीडियावर खूप गाजतो आहे. यावर मोठ्या संख्येत टीका होते आहे. काँग्रेसचे नेते व अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनीही मिथुनवर टीका केली आहे.

मिथुन म्हणाले होते – आमचा हक्क हिसकावला तर खबरदार, मी कोबरा आहे. मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल. यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणालेत, मिथुनने भाजपामध्ये प्रवेश केला हे चांगले आहे. मात्र पहिल्याच रॅलीत साप, विंचू, कोब्रा अशी तीव्र भाषा वापरायला नको. मिथुन हे माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही अनेक अनेक सिनेमात सोबत काम केले. ते लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. सभेत त्यांनी राजकीय मुद्दे मांडले असले तर बरे झाले असते. महिला दिनाच्या एका कार्यक्रमासाठी शत्रुघ्न सिन्हा नागपूरला आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER