ग्रामीण भागात लस मिळेना ; राष्ट्रवादीच्या नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली ‘ही’ मागणी

Shashikant Shinde-CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona virus) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर सरकारने 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. परंतू राज्यात लसीचा तुटवडा जाणवू लागल्यानं सर्वत्र लस मिळणं अवघड झालं आहे. शहरी भागात लस लवकर उपलब्ध होत आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 41% तर काही ठिकाणी 5% लसीकरण झाल्याचा रेफरन्स मिळत आहे. कुठेही 100% लसीकरण झालेलं नाही. त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे लसीबाबत एक मागणी केली आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनासुद्धा ऑनलाईन नोंदणी करून लस घ्यावी, असं सांगण्यात आलं आहे. त्या पद्धतीने नोंदणी होत असताना सातारा जिल्ह्यात होणारी लसीची नोंदणी पाहता जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबईसह बाहेरील जिल्ह्यातील लोकांची मागणी असल्याचं आढळून येत आहे, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

जर अशाप्रकारे बाहेरील लोकांची नोंदणी होत असेल तर सातारा जिल्ह्यातील लोकांना झालेल्या लसीकरणाचा आकडा फसवा व जास्त दिसून येईल,म्हणून राज्य सरकारने ऑनलाईन नोंदणी प्रणालीमध्ये बदल करून त्या जिल्ह्यातील लोकांची नोंदणी त्याच जिल्ह्यात होईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या लोकसंख्येनुसार लस उपलब्ध करून द्यावी. हे लसीकरण होताना 18 ते 45 वयोगटातील लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्यासच लस देण्यात यावी, जेणेकरून आधीच कमी असलेले लसीचे डोस वाया जाणार नाहीत, अश्या प्रकारची विनंती शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button