पक्षाशी निष्ठा कशी राखायची हे मला कुणीही सांगण्याची गरज नाही : शशिकांत शिंदे

NCP - Shashikant Shinde

सातारा : सातारा-जावळीचे भाजप (BJP) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांना राष्ट्रवादीत (NCP) येण्यासंदर्भात मी कुठलंही आमंत्रण दिलेलं नाही. पक्षाशी निष्ठा कशी राखायची याबाबत मला कुणीही सांगायची गरज नाही. पक्षाबद्दल निष्ठा कशी राखायची याची मला पूर्णपणे जाणीव आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार (Deepak Pawar) यांच्या सल्ल्यावर शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दीपक पवार यांचा गैरसमज झालेला आहे. मला पत्रकारांनी शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तर नगरपालिकेच्या निवडणुकीला काय कराल? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना पक्षाने जर त्यांना स्वीकारले, तर पालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली घेतली जाईल. याव्यतिरिक्त कोणतेही उद्गार काढले नाही, असे स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकदीने नगरपालिका लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. तो पूर्णपणे पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER