‘शशिकांत शिंदे आणि मी एकच !’ शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत परतण्याची चर्चा

Shashikant Shinde - Shivendra Raje Bhosale

सातारा : साताऱ्यातील दोन दिग्गज नेते आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांची एकेकाळी घट्ट मैत्री होती. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि शशिकांत शिंदे यांच्यासोबत त्यांचा संघर्ष सुरू झाला. मात्र आता पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिवेंद्रसिंह राजे यांनी शशिकांत शिंदे आणि शिंदेसाहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहीत नाही, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते राष्ट्रवादीत (NCP) परतण्याच्या चर्चाही साताऱ्यात सुरू झाल्या आहेत.

जावळी तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात शशिकांत शिंदेंना उद्देशून माझी वाट लावू पाहणाऱ्यांना संपवून टाकण्याची भाषा करणाऱ्या शिवेंद्रराजेंनी आज मात्र मेढा येथील सरपंच-उपसरपंच सत्कार सोहळ्यात यू-टर्न मारल्याचं बघायला मिळालं. यावेळी त्यांनी शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे हे बाकीच्यांना माहीत नाही, असं म्हणत राजकीय खळबळ उडवून दिली.

‘निवडणूक जिंकल्यानंतर कोण कुठं गेलं हे आम्हा दोघांनाही माहीत आहे.’ असंही शिवेंद्रराजे सरपंच-उपसरपंच सोहळ्यात म्हणाले. शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदे आणि आपण एकच असल्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER