‘आंदोलनजीवी’ शब्द हा निष्ठुर नाही का?- शशी थरूर

Shashi Tharoor

नवी दिल्ली :- राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विविध मुद्द्यांची चर्चा केली. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना मोदींनी ‘आंदोलनजीवी’ (Aandolan Jeevi) शब्द वापरला. ही नवीन जमातच अस्तित्वात आली असे ते म्हणाले. यावरून मोदींवर टीका होत आहे. ‘आंदोलनजीवी’ शब्दावरून माजी केद्रीय मंत्री शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही ट्विट करत भाजपाला टोला दिला.

विश्लेषकविश्लेषक आणि शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी या शब्दावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. तर शेतकरी नेते राकेश टीकैत यांनीही मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही ट्विट करून ‘आम्ही आंदोलनजीवी असल्याचा गर्व’ असे लिहिले आहे. त्यानंतर शशी थरूर यांनीही या शब्दाचा समाचार घेतला आणि अण्णा आंदोलनाची आठवण करून दिली. बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे (Anna Hajare) आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? आणि आंदोलनासाठी हा शब्द निष्ठुर नाही का? असा प्रश्न शशी थरूर यांनी ट्विटद्वारे विचारला आहे. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही ‘बुद्धीजीवी’ हा शब्द ऐकला होता.

परंतु काही लोक ‘आंदोलनजीवी’ झाले आहेत. देशात काहीही झाले की ते त्या ठिकाणी पोहचतात. कधी ते पडद्याच्या मागे, तर कधी पुढे. असे म्हणत मोदींनी निशाणा साधला. “जे आंदोलनजीवी आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. जिथे आंदोलन सुरू असेल तिथे ते पोहचतात. मग ते कुठलेही आंदोलन असो. ते वेगवेगळ्या आंदोलनांतून त्यांचे विचार आणि चुकीच्या भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात.

संजय राऊतांचा निशाणा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंदू है… ही घोषणा त्यांनी ‘आंदोलनजीवी’शी  जोडली.

अमोल कोल्हेंचा भाजपाला चिमटा

देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत, त्यातला एक आहे ‘आंदोलनजीवी’. या शब्दाबद्दल मी अतिशय आभारी आहे. भाजपाचे नेते ऊठसूट करत आंदोलन करतात, हे या शब्दवरून समजले. ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे त्या देशात या शब्दाचा प्रयोग असा कसा केला जाऊ शकतो? असा चिमटा खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER