‘त्या’ वक्तव्यावरून शशी थरूर यांनी मागितली मोदींची माफी!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. कोरोना काळातील मोदींचा पहिला परदेश दौरा आहे. ढाक्याजवळ असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर त्यांनी भाष्य केले की, “बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, तेव्हा अटक होऊन तुरुंगवासही भोगला.” असे ते म्हणाले. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहे, भारतीय जनतेचा बांगलादेश निर्मितीला पाठिंबा होता, तर मोदींनी सत्याग्रह का केला, अशी विचारणा केली जात आहे. मोदी बांगलादेशलाही फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते थरूर (Shashi Tharoor) यांनी केली होती. परंतु, चूक झाली आहे, हे लक्षात येताच कबुली देत त्यांनी मोदींची माफी मागितली आहे.

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते. यावेळी मला अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागला होता, असे मोदी यांनी उपस्थितांना सांगितले. सगळ्यांनाच माहीत आहे की, बांगलादेशला कोणी स्वातंत्र मिळवून दिले .” असे ट्विट शशी थरूर यांनी केली.

चूक लक्षात येताच प्रांजळ कबुली

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विटकरून चूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कबुली दिली आहे. मोदी यांना सॉरी म्हणत, माझी चूक असेल, तर ती मान्य करण्यात मला वाईट वाटत नाही. काल काही बातम्यांचे मथळे आणि ट्विट वाचून ट्विट केले. ‘बांगलादेशला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिले आहे, हे सगळ्यांना माहीती आहे.’ असे म्हणालो होतो. नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींच्या योगदानाचा उल्लेख केला नाही, असा त्याचा अर्थ होता. पण त्यांनी त्याचा उल्लेख केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER