एल्गार परिषदेच्या आयोजकांकडून शरजीलची पाठराखण

Sharjeel Osmani

पुणे : हिंदू समाजाबद्दल एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्गार परिषदेच्या आयोजकांनी माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी (Sharjeel Osmani) याला आपला पाठिंबा आहे, असे जाहीर केले.

एल्गार परिषदेत झालेल्या व्यक्तव्यावर आयोजक माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी माफी मागितली होती. शरजील चांगला बोलला पण त्याने ‘मनुवादी’ऐवजी ‘हिंदू’ शब्द वापरला ही त्याची चूक झाली, तसेच शरजीलला लक्ष्य करून संघ परिवाराने पुन्हा एकदा धार्मिक विद्वेषाचा आणि जातीयवादी चेहरा दाखवून दिला आहे, असे कोळसे पाटील यांनी म्हटले.

धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि राजद्रोहाचा गुन्हा शरजीलवर दाखल करण्यात आला आहे. पण, शरजील उस्मानीच्या पाठीशी आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक खंबीरपणे उभे आहोत, असे कोळसे पाटील यांनी सांगितले. तर भाजपने शरजीलवर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER