एल्गार परिषद गुन्हा रद्द करण्यासाठी शर्जील उस्मानीची हायकोर्टात याचिका

Shreejel usmani

मुंबई : यंदाच्या ३० जानेवारीस पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत केलेल्या भाषणावरून आपल्याविरुद्ध  स्वारगेट पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेला गुन्हा (FIR) रद्द करण्यासाठी  अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. बहुधा ती पुढील आठवड्यात प्राथमिक सुनावणीसाठी येईल.

भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) सचिव प्रदीप गावडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून उस्मानी याच्याविरुद्ध धर्माच्या आधारे समाजाच्या दोन वर्गांमध्ये वैर निर्माण केल्याचा गुन्हा (भादंवि कलम १५३ए) नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी गावडे हे पूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही कार्यकर्ते होते.  उस्मानी यांनी त्या भाषणात हिंदू समाज, न्यायव्ययवस्था व संसदेविषयी प्रक्षोभक विधाने केली, असा गावडे यांचा आरोप आहे. भीमा-कोरेगाव युद्धाच्या वर्धानदिनानिमित्त झालेल्या त्या परिषदेत निवृत्त न्यायाधीश न्या. बी. जी. कोळसे पाटील, लेखिका अरुंधती रॉय व पत्रकार प्रशांत कनोजिया याचीही भाषणे झाली होती.

हा गुन्हा बिनबुडाच्या आणि थिल्लर आरोपांवरून नोंदविण्यात आला आहे व त्यासाठी माझ्या भाषणातील फक्त काही वाक्ये संदर्भ सोडून वापरण्यात आली आहेत, असा दावा करून उस्मानी यांनी परिषदेत केलेल्या भाषणाचा संपूर्ण तर्जुमाही याचिकेसोबत जोडला आहे.

अ‍ॅड. आदिती सक्सेना यांच्यामार्फत केलेल्या या याचिकेत उस्मानी म्हणतो की, भाझ्या बाषणाचा रोख आणि शब्द पाहिले तर त्यात कोणाही समाजास दुसºयाविरुद्ध चिथावण्याच्या हेतूचा लवलेशही दिसत नाही. मी त्या भाषणात फक्त भारतीय समाजाला भेडसावणाºया काही समकालिन ज्वलंत प्रश्नांची चर्चा केली आहे व त्यातून मार्ग कसा काढता येईल याचाही उहापोह केला आहे. उलट आपल्याहून वेगळी मते असलेल्यांचे मन चर्चा आणि संवादाने वळविण्याचे प्रतिपादन मी त्यात केले होते. त्यातील काही कठोर शब्द वक्तृत्व जोरकस होण्यासाठी वापरले आहेत एवढेच.

याचिका म्हणते की, भाषणातील ती वक्तव्ये गुन्ह्याच्या वर्गात मोडतात की नाही हे ठरविण्यासाठी केवळ शब्द नव्हे तर त्यांचा श्रोत्यांवर होऊ शकणारा संभाव्य परिणाम लक्षात घ्यायला हवा. आणि यासाठीही निकष विवेकशील, खंबीर मनाची व धाडसी वृत्तीची व्यक्ती हा लावायला हवा. प्रत्येक विरोधी मतामध्ये ज्याला धोकाच दिसतो अशा बुझदिल व्यक्तीचा निकष याला लावता येणार नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER