
मुंबई : पुण्यात ३० जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील उस्मानी यानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच पाहिजे, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून एल्गार परिषदेत झालेल्या प्रकाराबद्दल भूमिका मांडली. भावना दुखावणाऱ्या वक्तव्याला माफी नाही, असे ते म्हणालेत. भाजपादेखील या प्रकरणी आक्रमक आहे. भाजपा राज्यभर शरजील उस्मानी विरोधात गुन्हे दाखल करणार आहे. भाजपाचे आमदार राम कदम, अतुल भातखळकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी …भावना दुखावणाऱ्या वक्तव्याला
माफी नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 2, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला