शरद पवारांच्या पावसातील सभेचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळे म्हणाल्या ….

Supriya Sule-Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकार (MVA) अस्तित्वात आणणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्या साताऱ्यातील पावसाच्या सभेला रविवारी एक वर्ष पूर्ण होत आहे . यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विट करत शरद पवारांचे कौतुक केले आहे .

महाराष्ट्रातील या सत्ताबदलाची व पवारांच्या साताऱ्याच्या पावसातील सभेची देशभर चर्चा झाली . सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे की,’प्रतिकूल परिस्थितीतही मैदानात ठामपणे उभे राहून यशस्वी झुंज देण्यासाठी जी शक्ती लागते तिचं नाव आदरणीय शरद पवार साहेब…!

दरम्यान २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला (BJP-Shivsena) बहुमत मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा दाखवणाऱ्या दिवसाची आज (१८ ऑक्टोबर) वर्षपूर्ती होय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा येथील भर पावसातील ‘ती’ सभा राज्यातील जनतेच्या मनात घर करून गेली. आणि विधानसभा निवडणुकीचे चित्रच बदलून गेले. सत्तेची थोडीही आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी जवळीक साधून महाआघाडी स्थापन करत राज्यात सत्ता स्थापन केली. हे विशेष .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER