पोलीस विभागातील भ्रष्टाचाराबाबत आम आदमी पार्टीकडून व्हिडिओ शेअर

AAP

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवले आहे. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी चालून धरली आहे. तर दुसरीकडे पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात आहे. आणि अश्यातच आम आदमी पार्टीने एक व्हिडीओ शेअर करत भ्रष्टाचार होत असल्याचे उघड केले आहे.

अंडरवर्ल्डचा शार्प शुटर एजाज लकडावाला याचा हा व्हिडीओ असून, या व्हिडिओत त्याने आयपीएस अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांचा उल्लेख केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून खंडणी उकळतांना देवेन भारती हे क्राईमचे बॉस आहेत. त्यांनाही यातला अर्धा हिस्सा द्यावा लागतो, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली होती. मात्र आता मला माहिती मिळाली की देवेन भारती हे एटीएसचे प्रमुख आहे.

बघा संपूर्ण व्हिडीओ…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER