गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात, सचिन आणि लतादीदींच्या ट्वीटमागे …

भाजपाच्या आयटी सेलची होणार चौकशी

Sachin Tendulkar - Lata Mangeshkar - Anil Deshmukh

नागपूर : शेतकरी आंदोलनाबद्दल आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ट्वीट केले होते. त्यांच्या ट्वीटबद्दल भाजपच्या (BJP) आयटी सेलची होणार आहे. या प्रकरणी १२ जणांची ओळख पटली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली. अनिल देशमुख कोरोनातून बरे झाले आहेत. आज त्यांना सुट्टी मिळाली. नागपूरच्या एक खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर ५ फेब्रुवारी पासून उपचार सुरू होते.

शेतकरी आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्वीटची चौकशी होणार अशी चर्चा सुरु आहे. याबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणालेत, सेलिब्रिटींच्या ट्वीट प्रकरणात माझा शब्दाचा विपर्यास करण्यात आला. भाजपाच्या आयटी सेलची चौकशी करणार आहोत. यात १२ लोकांची ओळख झाली आहे, त्यांची चौकशी होणार आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर हे आमचे दैवत आहे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबद्दल तक्रार केली होती. रिहानाने ट्वीट केल्यानंतर अनेक कलाकार, खेळाडू यांनी एक सारखे ट्वीट केले. यातील शब्द अगदी एकसारखेच होते. या सेलिब्रिटींनी एक सारखे ट्विट का केले? या संदर्भात दबाव नेमका कोणाचा होता का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सावंत यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER