शारदा घोटाळा : राजकारणी आणि प्रभावशाली लोकांनी घेतला लाभ; सुदिप्ता सेनचा आरोप

Sundipta Sen

हजारो कोटींच्या शारदा घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुदिप्ता सेनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून कळवले आहे की, काही प्रमुख राजकारण्यांसह अनेक प्रभावशाली व्यक्तींनी माझ्याकडून आर्थिक फायदा घेतला आहे. हा घोटाळा २०१३ चा आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी विनंती करणारी याचिका सेन याने १ डिसेंबर रोजी केली होती. सेन याने पत्रात म्हटले आहे की, ‘आदरणीय सर आणि आदरणीय मॅडम, मी शारदा कंपनी समूहाचे मालक आणि संचालक सुदिप्ता सेन, मला सांगायचे आहे की, बऱ्याच प्रभावशाली लोकांनी माझ्याकडून आर्थिक लाभ घेतला आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या यादीमध्ये माकपा, भाजपा, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या अनेक राजकारण्यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात आवश्यक ती कारवाई करावी अशी मी सीबीआय आणि राज्य पोलिसांना विनंती करतो.

सध्या येथे राष्ट्रपतींच्या सुधारगृहात बंदिस्त असलेले सेन यांनी पत्रात म्हटले आहे की, यापूर्वी मी सीबीआय आणि पश्चिम बंगाल पोलिसांना याप्रकरणी माहिती दिली होती, परंतु काहीही कार्यवाही झालेली नाही. मी सीबीआयला याबद्दल सर्व काही सांगितले आहे. उच्च नैतिकतेबद्दल बोलणाऱ्यांनी गरीब लोकांची फसवणूक केली हे पाहून मला खूप वेदना होत आहेत. मी सीबीआय आणि राज्य पोलिसांना या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची विनंती करतो.

प्रक्रियेचा एक भाग म्हणून एडीजी (सुधार गृह) पीयूष पांडे यांना हे पत्र सादर करण्यात आले आहे, असे जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पांडे यांनी मात्र याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. माकपाचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी सेन याचे आरोप खोदून काढले. हे आरोप कचरा आहेत, असे म्हणालेत. काँग्रेसनेही हा पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भाजपाच्या राज्य नेतृत्वानेही संपूर्ण प्रकरण ‘गलिच्छ राजकारण’ आहे, असे घोषित केले. सीबीआयच्या चौकशीत या प्रकरणातील सत्यता उघड होईल, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER