शरद पवारांचे ‘ते’ शब्द प्रविण दरेकरांच्या जिव्हारी लागले! दरेकरांचे पवारांना पत्

Sharad Pawar - Pravin Darekar

मुंबई :- शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी काही विधान केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोदी पक्षनेता या पदावरच घणाघात केला. त्यानंतर शरद पवारांचे ते शब्द प्रविण दरेकर यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी दरेकर यांनी शरद पवार यांना नम्रता पुर्वक एक पत्र लिहीले आहे आणि आपले म्हणणे मांडले आहे. तसेच या पत्रासोबत दरेकर यांच्या २८ जानेवारीला प्रकाशित होणाऱ्या “वर्षभराचा लेखाजोखा” या पुस्तकाची प्रत सुद्धा शरद पवार यांना पाठवलेली आहे.

हे पुस्तक नजरेखालून घातल्यानंतर “आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होतो, याबद्दल आपणास कधीही वाईट वाटणार नाही किंवा या पदाचं अवमुल्यन झाल्याचं शल्यही आपल्याला राहणार नाही. या बद्दल मला विश्वास आहे. तसेच आपल्या सूचना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी नेहमीच नवऊर्जा ठरतात, असेही दरेकर यांनी आज शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर सर्वप्रथम शरद पवार यांच्या अवलोकनार्थ एक प्रत सुपुर्द करणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं भाग्य समजतो – प्रविण दरेकर

दरेकर यांनी शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आपण देशाचे, राज्याचे एक आदरणीय नेते आहात परंतु, मी यासाठी व्यथित झालो की, त्या प्रकरणाची एकच बाजू आपल्यासमोर आल्यामुळे आपल्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वाला वाईट वाटलं आणि पदाचं अवमूल्यन झाल्याची भावना आपल्यात निर्माण झाली. परंतु, मी महिला शेतकऱ्यांबाबत मांडलेला मुद्दा हा प्रत्यक्षदर्शी त्या महिलांशी बोलल्यानंतर व्यक्त केला होता त्यात कोणताही राजकीय अभिनिवेश नव्हता, उलटपक्षी विरोधी पक्षनेता पदाच्या कर्तव्य भावनेने या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा केलेला एक विनम्र प्रयत्न होता. असेही दरेकर यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

दरेकर यांनी पवार यांना पाठविलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, “वर्षपूर्तीचा लेखाजोखा” या पुस्तकाच्या निमित्ताने हा संवाद मी पत्ररुपाने आपल्याशी अत्यंत विनम्रतेने साधत आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर माझ्या पक्षाने 16 डिसेंबर 2019 ला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली. विरोधी पक्ष नेता म्हणून गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा “लेखाजोखा” सादर करणं, हे मी माझं कर्तव्य समजतो आणि याच कर्तव्य भावनेने मी हा लेखाजोखा तयार केलेला आहे असे दरेकर पत्रात विनम्रतेने म्हणाले आहेत.

तसेच, पक्षाने आपल्यावर विरोधी पक्षनेता या पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर आपण कशा प्रकारे या पादाला न्याय दिला याचा संपुर्ण लेखाजोखा असलेले पुस्तकाची प्रत दरेकर यांनी पवारांना पाठवली आहे.

दरेकर पत्रात हे देखील म्हणाले की, हा लेखाजोखा सादर करण्यामागे किंवा या पत्रद्वारा आपल्याशी संवाद साधण्यामागे स्वस्तुतीचा भाग गौण आहे, त्यापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून मी बजावलेले माझे निहित कर्तव्य आणि या पदाचा सन्मान वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देण्याचा हा एक यथार्थ प्रयत्न आहे. आजपर्यंतच्या विधान परिषदेच्या मा. विरोध पक्षनेत्यांनी त्यांचे वार्षिक कार्यअहवाल जनतेपुढे ठेवले किंवा नाही, याची मला कल्पना नाही. परंतु पक्षाने, पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे निर्वहन जनतेसाठी कसे केले, याची माहिती अहवालरुपाने देण्याचा उद्देश “वर्षभराचा लेखाजोखा” हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे आहे, या पुस्तकाचे प्रकाशन 28 जानेवारीला होणार आहे.

काय म्हणाले होते शरद पवार –

शेतकरी आंदोलनावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER