‘शरद पवारांचं धोरण आणि महाविकास आघाडीच्या विजयाचं तोरण’

Sharad Pawar - Srinivas Patil

कराड : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जबर धक्का देत सहा जागांपैकी चार जागांवर दणदणीत विजय मिळवला. यावरुन राष्ट्रवादीचे (NCP) खासदार श्रीनिवास पाटील यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे धोरण आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांचे विजयाचे तोरण, यामुळेच पदवीधर शिक्षक निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला’, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांनी दिली आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि आघाडीला दणदणीत यश मिळालं. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बहुजन समाजाच बळ किती प्रमाणात वाढू शकते, याचं हे उदाहरण आहे. शरद पवारांचं धोरण आणि तीन पक्षांनी बांधलेलं तोरण यातून हा विजय झालेला आहे. सहाही जागा जिंकण्याचा दावा करणा-यांना एका जागेवर समाधान मानावं लागलं, असा टोलाही श्रीनिवास पाटील यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER