
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शनिवारी याबाबत स्पष्टीकरण दिले. एका वरिष्ठ नेत्याच्या विधानाला वडिलांचा सल्ला मानला पाहिजे, असे तपासे यांनी म्हटले आहे.
‘शरद पवारांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जे जे सांगितले ते ज्येष्ठ नेत्याचा आणि वडिलांचा सल्ला मानला पाहिजे. महाविकास आघाडी हे तिन्ही पक्षांचे सरकार आहे. शरद पवार यांनीच आपल्या पुस्तकात राहुल गांधींवर भाष्य केल्याबद्दल बराक ओबामा यांच्यावर टीका केली होती. ओबामांनी इतर देशांच्या नेत्यांविषयी भाष्य करू नये, असे पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते’, असे तपासे म्हणाले.
नुकतेच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले होते की, काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांच्यात राष्ट्रीय नेते म्हणून जे गुण असायला हवे, ते नाहीत. त्यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसून येत आहे, असा चिमटा. या टिप्पणीला उत्तर देताना महाराष्ट्र मंत्री आणि कॉंग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी सत्ताधारी महा विकास आघाडीतील मित्रपक्षांना महाराष्ट्रात स्थिर सरकार हवे असेल तर कॉंग्रेसच्या नेतृत्त्वावर भाष्य करणे थांबवावे असा आग्रह धरला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला