शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे तपासण्याची गरज; नाना पटोलेंचा टोमणा

Maharastra-Today

मुंबई :- युपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्यात यावे यासाठी शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) सध्या रोज वकिली करत आहेत. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाद्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण, संजय राऊत ऐकायला तयार नाहीत. याबाबत त्यांचे सतत बोलणे सुरु आहे. यावर नाना पटोले यांनी टोमणा मारला – शरद पवार (Sharad Pawar) शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे हे तपासण्याची गरज आहे.

पटोले म्हणालेत, शरद पवार शिवसेनेत (Shivsena) की राष्ट्रवादीत आहेत हे तपासण्याची गरज आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहे हे आम्हाला माहीत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, सामना पेपरचे संपादक आहेत हे पण आम्हाला माहीत आहे. परंतु अलीकडच्या काळात आम्हाला त्यांचे नवे रूप पाहायला मिळते आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते किंवा शरद पवारांचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत. हे योग्य नाही. जे या युपीएचा हिस्साच नाही त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत या संदर्भात बोलणार आहे. त्यांना आमच्या नेत्यांवर टीका करायची असेल तर मग आम्हालाही विचार करावा लागणार हे आम्ही निश्चितपणे त्यांना ठणकावून सांगणार आहोत. आमच्यामुळे सरकार आहे, आम्ही सरकार नाही हे पहिल्या दिवशीच सांगितले आहे. संजय राऊत ज्या पवार साहेबांची येथे वकिली करत आहेत ती वकिली त्यांनी थांबवावी, असा सल्ला पटोले यांनी राऊतांना दिला.

ही बातमी पण वाचा : राऊतांनी कोणाचे प्रवक्ते जाहीर करावे : नाना पटोले; थोरात म्हणतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER