मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शरद पवारांचा कार्यक्रम लांबणीवर

सोलापूर : जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhva Thackeray) यांच्या संभाव्य दौऱ्याचा कार्यक्रम आल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा १० ऑक्टोबरचा दौरा लांबणीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी शुक्रवारी जाहीर केलेला नियोजित दौराही अचानक रद्द केल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत .

कोरोना साथीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी सोलापूर दौरा केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात ते पंढरपूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातच त्यांनी १० ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे पवार यांच्या दौऱ्याबद्दल कुतूहल वाढले आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनी मुंबईत त्यांची घेतलेली भेट व शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमाला हजेरी हे विषय चर्चेचे झाले आहेत.

नियोजित तारीख जवळ आली तरी खासदार पवार यांच्या दौऱ्याबाबत अधिकृत कार्यक्रम न आल्याने संबंधित कार्यक्रम संयोजकांकडे विचारणा केली असता मुख्यमंत्री ठाकरे यांचाही २४ आॅक्टोबर रोजी दौरा ठरत असल्याने नियोजित कार्यक्रम पुढे गेल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER