शरद पवारांच्या भाकिताची फडणवीसांनी केली सप्रमाण टिंगल, म्हणाले…

Sharad Pawar & Devendra Fadnavis

पुणे : पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा (BJP) फक्त आसाममध्ये जिंकेल, असे भाकीत राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवारांच्या भाकिताची टिंगल करताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दाखल दिला – २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी भाकीत केले होते, भाजपाला फक्त १८० जागा मिळतील. भाजपाला २०१४ पेक्षा जास्त जागा मिळाल्या. पूर्ण बहुमत मिळाले.

पवार म्हणाले होते, आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल. हा ‘ट्रेंड’ असून, हा पाच राज्यांचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल. पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करते आहे. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER