शरद पवारांचा ‘तो’ अंदाज खरा ठरला ; दीड महिन्यापूर्वीच वर्तवले होते निकालाचे भाकित

Sharad Pawar

मुंबई : देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. मतमोजणीला सुरुवात होऊन सहा तास उलटले आहेत. पाच राज्यांपैकी केवळ एका राज्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे .

पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक भाकित वर्तवले होते . इतर चार राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये भाजपची (BJP) स्थिती चांगली आहे. त्यामुळे तिथे भाजप सत्ता राखेल. तर इतर राज्यांमध्ये दुसरे पक्ष विजयी होतील, असे शरद पवारांनी म्हटले होते .

पवारांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. केंद्रातील सत्तेचा पूर्ण गैरवापर करूनही भाजपला बंगालची सत्ता मिळणार नाही. ममता बॅनर्जी सत्ता कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button