‘शरद पवार जी कि राजनीती का तो दौर अब शुरू हुआ है’

Jayant Patil - Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी वयाच्या 81 व्या वर्षात पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवार हे महाराष्ट्र घडवणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. ‘शरद पवार जी कि राजनीती का तो दौर अब शुरू हुआ है’ असे वक्तव्य करत त्यांनी विरोधकांनाही इशारा दिला आहे.

हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम- सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा विराजमान झाल्याचे ट्विट जयंत पाटील यांनी केले.

२०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी शरद पवार नावाचा चमत्कार बघितला आहे. स्वतःला देशाचे मालक समजणाऱ्या लोकांचा ‘बाप आला‘ असे म्हणत लोकांनी साहेबांचे राज्यभर स्वागत केले, त्यांचे नेतृत्व स्वीकारले. ‘शरद पवार जी कि राजनीती का तो दौर अब शुरू हुआ है’ हे विरोधकांनी समजून घ्यावे, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER