
मुंबई : केंद्र सरकारच्या मदतीने भाजपा पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचा कट रचत आहे, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी केला. विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फोनवर चर्चा केली. गरज भासल्यास शरद पवार ममताच्या भेटीसाठी पश्चिम बंगालला जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली.
ममता बॅनर्जी पुढील महिन्यात कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळावा आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी शरद पवार यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांच्यांशी त्यांनी फोनवर चर्चा केली. या नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. भाजपा विरोधात रणनीती ठरवण्याबाबतही चर्चा झाली, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला