शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द नाही; स्थगित – एकनाथ खडसे

Eknath Khadse - Sharad Pawar

जळगाव : राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा २० नोव्हेंबरपासून होणार नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा कोरोनामुळे (Corona) स्थगित करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेला नाही; अशी माहिती एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली. खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला असून राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा प्रण केला आहे.

शरद पवार २० आणि २१ रोजी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या या दौऱ्यात मोठी गर्दी होण्याची शक्यता होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणे हे अडचणीच ठरू शकणार असल्याने शरद पवार यांच्या या दौऱ्याला प्रशासनाने परवानगी दिली नाही त्यामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. तो रद्द करण्यात आला नाही, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER