सह्याद्री पर्वतावर नव्याने आढळलेल्या वनस्पतीला शरद पवारांचे नाव

Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई :- कोल्हापुरातील (Kolhapur) दोन युवा प्राध्यापक वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांना सह्याद्री पर्वतरांगेत नव्या वनस्पतीचा शोध घेण्यात यश प्राप्त झाले आहे. या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राजकारणातील सह्याद्री अशी ओळख असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव देण्यात आले आहे. ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाईल. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल वनस्पतींना पवारांचे नाव देण्यात आल्याची माहिती या संशोधकांनी दिली.

गारवेल कुळातील ही वनस्पती आहे. डॉ. विनोद शिंपले हे गेली वीस वर्ष या कुळातील वनस्पतींच्या अभ्यासासाठी जगात नावाजले गेले आहेत. आजवर त्यांनी गारवेल कुळातील पाच नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. जगभरात त्यांच्या सशोधनाला मान्यता मिळाली आहे. ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नव्या वनस्पतीचे संशोधन कालिकत विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्या रिडीया या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी याबद्दल ट्विटरवरुन संशोधकांचे आभार व्यक्त केले. “सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या एका वनस्पतीचा शोध डॉ. विनोद शिंपले आणि डॉ प्रमोद लावंड यांनी लावला असून त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव दिले आहे. आता ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाईल. या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे असं आदरणीय साहेब मानतात. असा आदर आणि सन्मान केवळ कुटुंबातच होऊ शकतो. या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीचे संशोधन साहेबांच्या नावे समर्पित केले. याचा मला नितांत आदर आहे. धन्यवाद” असे ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button