खडसेंच्या पक्षांतरानंतर शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्रात पहिला दौरा ; उद्या नाशिकमध्ये

Sharad Pawar & Eknath Khadse

मुंबई :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसध्ये प्रवेश केला. ४० वर्षांचे भाजपसोबतचे नाते त्यांनी अखेर तोडले आणि राष्ट्रवादीत सामील झाले. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने आता उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा बसणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. खडसेदेखील आता जोमाने राष्ट्रवादीच्या कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या खडसेंच्या प्रवेशानंतर पहिलाच उत्तर महाराष्ट्रात दौरा करणार असल्याचे समजते.

खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिथे जिथे त्यांचे बळ आहे तेथे स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचेही म्हटले आहे. तसेच, आतापर्यंत घरात नुसताच बसून होतो. आता राष्ट्रवादीसाठी जोमाने काम करणार असल्याचेही ते म्हणाले होते. खडसेंनी हा विश्वास दिल्यानंतर आता शरद पवार हेदेखील मैदानात उतरले आहेत. उद्या ते नाशिक येथे जाणार असल्याचे वृत्त आहे.

आज त्यांनी ‘व्हीएसआय’मध्ये बैठक घेतली. ऊसतोड कामगार संघटनांसोबत या बैठकीत चर्चा झाली. ऊसतोड मजुरांना सरासरी १४ टक्के दरवाढ, प्रतिटन ३५ ते ४० रुपयांची वाढ मिळणार, असे सांगितल्यानंतर सर्व संघटनांनी संप मागे घेतला आहे.

ही बातमी पण वाचा : खडसेंच्या पक्षांतरानंतर गिरीश महाजन अ‍ॅक्टिव्ह, रक्षा खडसेंच्या गैरहजेरीवर दिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER