यूपीएच्या संभाव्य अध्यक्षपदावरून शरद पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

Sharad Pawar

नवी दिल्ली : महाराष्ट्राप्रमाणे देशभरातील विरोधकांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीमागे काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये झळकत होत्या. मात्र या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण खुद्द शरद पवार यांनी दिल आहे.

महाराष्ट्रात भाजपाला हद्दपार करण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांची वर्षभरात चांगलीच गट्टी जमली. राष्ट्रीय स्तरावरही विरोधी अश्याच प्रकारे पक्षांशी मोट बांधली जावी, याकरिता सोनिया गांधी शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. महाराष्ट्रातला कित्ता दिल्लीतही गिरवला जावा आणि केंद्रामधलं सरकार सत्तेच्या खाली खेचावं, हे सगळं प्लॅनिंग पवारांकडे देण्याचं नियोजन सोनिया यांचं असल्याचं बोललं गेलं. मात्र “या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही”, असं दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. याच विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या बातम्या दिवसभर माध्यमांधून देण्यात आल्या. मात्र यूपीएचं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER