शेतकरी दिनानिमित्त शरद पवार यांचे भावनिक ट्विट

Sharad Pawar-Farmers Day

मुंबई :- एकीकडे देशात दिल्ली सीमेसह अन्य ठिकाणी नव्या कृषी विषयक कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे आज राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भावनिक ट्विट केले आहे.

शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. “अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतंय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो.”, अशा आशयाचे पवार यांनी केले आहे. अद्यापही शेतकरी आंदोलन थांबविण्यात केंद्र सरकारला यश आले नसल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER