मुंबई बाजार समितीत शरद पवारांचेच वर्चस्व, बारामतीच्या जावयांना सभापतीपदाची संधी

Sharad Pawar - Ashok Duck - Ajit Pawar

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मुंबई (Mumbai) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दणदणीत विजय मिळवला होता. मात्र कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे पदाधिकाऱ्यांची नेमणूक लांबणीवर गेली होती. अखेर या समितीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निष्ठावान कार्यकर्ते तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खंदे समर्थक अशोक डक यांना सभापतिपद देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवारांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

मुंबई एपीएमसीच्या सभापतीपदी अशोक डक तर उपसभापतीपदी धनंजय वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी आहे. अशोक डक यांना शरद पवारांकडून एकनिष्ठेचे फळ मिळाले आहे. पवारांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी असल्याने सासरवाडीकडून अधिक मासाचे ‘धोंडे’ गिफ्ट असल्याची प्रतिक्रिया माजलगावकरांमधून व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER