शरद पवारांचा थेट केरळात डंका; काँग्रेसला खिंडार पाडत महिला नेत्या लवकरच राष्ट्रवादीत

Sharad Pawar - Maharashtra Today

तिरुअनंतपुरम : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले आहेत. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्याने संतप्त होत मुंडण करणाऱ्या राज्य महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष लतिका सुभाष या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादीचे केरळ प्रदेशाध्यक्ष पी. सी. चाको यांच्यासोबत लतिका यांची चर्चा झाली असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

महत्त्वाचे  म्हणजे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य असलेले चाकोदेखील याच महिन्यात राष्ट्रवादीमध्ये आले होते. चाको यांनी १० मार्चला काँग्रेसचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी मुंबईत येत निवडणुकीचा प्रचार सुरू  असताना शरद पवारांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीवरून गटबाजी केल्याचा आरोप चाको यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, जो काँग्रेसच्या परंपरेशी जोडलेला आहे. तसेच चाकोंसोबत चांगले संबंध आहेत. यामुळे मी चाकोंसोबत चर्चा केली.

लवकरच माझ्या निर्णयाची घोषणा केली जाणार आहे, असे लतिका सुभाष यांनी सांगितले. लतिका सुभाष यांचा अनुभव पाहता त्यांना पक्षात एक मोठी जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे. सुभाष या ६ एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत एत्तुमानूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या होत्या. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपण अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button