शरद पवारांचा एक निर्णय; पेटणार पुन्हा काका पुतण्याचं राजकारण

Sandeep kshirsagar

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचं राजकारण ही जणू प्रथाच झाली आहे असे दिसते. राजकारणात कुठे काका पुतण्याची गोड जोडी तर कुठे काका पुतण्यांमध्ये राजकारण पेटल्याचे उदाहरणं आहेत.

गोपीनाथ मुंडे – धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय मतभेद राज्याच्या राजकारणात लपलेले नाहीत. तर दुसरीकडे शरद पवार – अजित पवार यांच्यात नेहमी काका – पुतण्यांमधलं प्रेम पाहायला मिळाले आहे. मात्र, विधानसभेच्या पार्श्वभूमिवर शरद पवारांचा एक निर्णय बीड मध्ये काका – पुतण्यामध्ये राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

हि बातमी पण वाचा : विधानसभेत अजित पवारांना पराभूत करू म्हटलं तर तुम्ही मोठ्याने हसाल – चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीच्या विधानसभा आढावा बैठकीत बीड विधानसभेसाठी संदीप क्षीरसागर यांना शरद पवारांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संदीप क्षीरसागर यांचे काका मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करा असा आदेश संदीप यांना देण्यात आला आहे.

यापू्र्वी बीड जिल्हात गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे काका पुतणे वाद रंगला होता. महाराष्ट्राच्या राजकारणातही बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राज ठाकरे या काक पुतण्या वाद रंगला होता. आता बीड विधानसभेसाठी जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी जयदत्त क्षीरसागर यांना बळ देणार आहे.

संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. काही दिवसआधीच जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात आपल्याला कमी महत्त्व दिले जाते असं जयदत्त क्षीरसागर यांना वाटत होतं. तिथे धनंजय मुंडे यांचं वजन वाढत असल्याने त्या दोन नेत्यांमध्ये फारसं सख्य नव्हतं. तर आतापर्यंतच्या राजकारणात शरद पवार – अजित पवार या काका पुतण्यांमधलं प्रेमच जनतेनी अनुभवलं.