शरद पवारांकडून भाजपसह मनसेला धक्का, दिग्गज नेत्यासह संपर्कप्रमुख राष्ट्रवादीत

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (NCP) मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे (BJP) माजी आमदार उदयसिंग पाडवी (Uday Singh Padvi) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER