यूपीए अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) (UPA) अध्यक्षपद सोपवण्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून युपीए मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान शऱद पवार यांनी युपीए अध्यक्षपदावरुन महत्वाचे भाष्य केले आहे.

माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. शरद पवार यांनी याआधीदेखील युपीए अध्यक्ष होण्याचे वृत्त फेटाळले होते . प्रसारमाध्यमांशी बोलताना शऱद पवार यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचे म्हटले. ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका, असे शरद पवार यांनी प्रसारमाध्यांना उद्देशून म्हटले होते .

दरम्यान दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते विरोधी नेत्यांची भेट घेतील. दरम्यान शरद पवार यांनी दिल्ली दौऱ्याआधीएका वृत्तवाहिनीला बोलताना युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी युपीए अध्यक्षपदी विराजनमान होण्याचे वृत्त फेटाळले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांचे बाबूंच्या पोस्टिंगबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER