शरद पवारांचा मोठा निर्णय; अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचे केले स्पष्ट

Anil Deshmukh-Sharad Pawar

नवी दिल्ली :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Commissioner Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. परमबीर सिंग यांनी सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची जी तारीख सांगितली त्यावेळी ते नागपुरातील आपल्या घरी होमक्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी पत्रात दिलेली माहिती चुकीची असून, आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांनी मागणी केली तरी त्यांची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज दिले. दिल्ली येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रमच विशद केला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि १५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन चा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.

हे सगळं इतर गोष्टींवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं घडवण्यात आल्याची शंका उत्पन्न होत आहे. मुख्य प्रकरण काय आहे तर संबधीत गोष्टी अंबनीच्या घराखाली गाडीत कशा आल्या, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. गाडी कुणाची होती? कुणाच्या ताब्यात होती? कुणी वापरली? आणि गाडीमालक हिरनची हत्या कशी झाली हे माझ्यासाठी महत्वाचं आहे.

काल एटीएसने दोघांना अटक केली, हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे, यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली. त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केली आहे. हिरेन केसमध्ये एटीएस करेक्ट दिशेला आहे. आता तपासात सत्य बाहेर येईल. उद्या-परवा कधी येईल माहिती नाही. मात्र मला आनंद आहे, मुख्य केस जे सीपींच्या आरोपानंतर दुर्लक्षित होत होती, अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांची, त्याबाबत चौकशी होत आहे

लक्ष विचलित करण्यासाठी हा आरोप करण्यात आला आहे. हिरेन हे त्या जीपचे मालक होते, त्यांची हत्या झाली. एटीएसने त्यामध्ये दोघांना अटक केली आहे. या केसमधून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत होता. परमबीर सिंग यांच्या बदलीची माहिती त्यांना मिळाल्यानंतर हे आरोप केले असावेत. परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वाझेंना बोलवले होते असे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर गृहमंत्री मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले असे लिहिलंय. मात्र आमची भेट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात झाली होती. परमबीर सिंग हे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गप्प का होते. ते आरोपासाठी महिनाभर का थांबले. परमबीर सिंग यांच्या बदलीची माहिती त्यांना मिळाल्यानंतर हे आरोप केले असावेत. मला त्यात पडायचं नाही. आरोप करण्यासाठी परमबीर एक महिना का थांबले? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेले आरोप फेटाळून लावत देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : पवारांचं ठरलं ; पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांना उमेदवारी, मात्र अजितदादा संभ्रमात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER