
मुंबई :- राज्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली आहे. माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण हे करताना कोरोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 22, 2021
शरद पवार यांनी ट्विट करत आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, हे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आले होते, रविवारीच मंत्री छगन भुजबळ यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसमारंभात उपस्थिती लावली होती, या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेदेखील हजर होते, त्यामुळे शरद पवारांनी खबरदारी म्हणून १ मार्च पर्यंत त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
ही बातमी पण वाचा : ‘त्या’ लग्नानंतर छगन भुजबळांना कोरोना, सोबत असलेले शरद पवार क्वारंटाईन होणार ?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला