शरद पवार यांचे बगलबच्चे एफआरपी कायदा मोडतात : स्वाभिमानीचा आरोप

Sagar Shambhushe-Sharad Pawar

कोल्हापूर : माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि खासदार शरद पवारांनी (Sharad Pawar) एकरकमी एफआरपीचा कायदा केला असला, तरी राज्यात पवार यांचे बगलबच्चे एफआरपी बुडविण्यामध्ये अग्रेसर आहेत. यामुळे जर पवारांनी कायदा केला असला तरी त्यांचे बगलबच्चे तो कायदा का पाळत नाहीत? याचे उत्तर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे (Sagar Shambhushe) यांनी केली.

कोल्हापुरातील काल शनिवारी एका कार्यक्रमामध्ये मंत्री मुश्रीफ यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांची ऊस परिषद आणि आंदोलन कशासाठी असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य करत असताना स्वतः मुश्रीफ पालकमंत्री असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन वर्षे झाली असूनही, एफआरपी मिळत नाही. यावर आपण काय कार्यवाही केली.

सत्तेत येईपर्यंत राजू शेटटी यांच्या आंदोलनांचे कौतुक केले व सत्तेत आल्यानंतर आंदोलनाची दिशा बदला, असे म्हणण्यापेक्षा स्वत: आंदोलनात सहभागी होऊन राज्य आणि केंद्र सरकारला धोरण राबविण्यास भाग पाडावे. तुमच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असेलेले जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यांची एफआरपी थकीत आहे. यामुळे जरी एफआरपीचा कायदा शरद पवार यांनी आणला असला तरी, त्यांचेच बगलबच्चे तो कायदा धाब्यावर बसवत असल्यामुळेच राजू शेट्टी यांच्या ऊस परिषद व आंदोलनाची गरज आहे, असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

ही बातमी पण वाचा : राजू शेट्टींची ऊस परिषद आणि आंदोलन आता कशासाठी : मुश्रीफ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER